Friday 13 July 2012

नरजन्माचें काय कारण?




कालची दारासिंहाच्या मृत्युची बातमी सगळ्यांना दु:ख देऊन गेली. प्रत्येक भारतीय हळहळला, पण मरण हे जीवाची अपरिहार्यता आहे. साईसच्चरिताच्या ४३व्या अध्यायामध्ये हेमाडपंत आपल्याला हेच सांगतात.
जननापाठी चिकटलें मरण l एकाहूनि एक अभिन्न l मरण जीवप्रकृतिलक्षण l जीवाचे जीवन ती विकृती ll
- अध्याय ४३ ओवी ५२
मरण ही देहाची प्रकृति l मरण ही देहाची सुस्थिति l जीवन ही देहाची विकृती l विचारीवंती विचारिजे ll
- अध्याय ४३ ओवी ५६

पण मग हे जर असंच असेल तर जन्माला येऊन काय करायचं हा प्रश्‍न प्रत्येकाला पडू शकतो व पडतोच. जेव्हा लेखाजोखा करायची वेळ येते तेव्ह; "मी काय मिळविलं?" हा प्रश्‍न पडतोच. हा नरजन्म कशासाठी ह्या बद्दल हेमाडपंत लिहतात, 

आला कोठूनि आहे कोण l नरजन्माचें काय कारण l एथील बीज जाणे तो प्रवीण l त्यावीण शीण मज सारा ll
- अध्याय ८ ओवी १६
शाश्‍वत सुख आणि शांति l हेंच ध्येय ठेवूनि चित्तीं l भूति भगवंत हे एक उपास्ति l परमप्राप्तिदायक ll
- अध्याय ८ ओवी ३१ 

आणि म्हणूनच हेमाडपंत समजावून सांगतात हा नरदेह कसा वापरु नये आणि कसा वापरावा. 

आहार-निद्रादी चतुष्टय l यांतचि होता आयुष्यक्षय l मग श्‍वांनां-मानवां भेद काय l करा निर्णय विवेकें ll
- अध्याय ८ ओवी १२
मानावा तो केवळ चाकर l नका बैसवूं त्या डोक्यावर l लाड नं पुरवा निरंतर l नरकद्वार करु नका ll
- अध्याय ८ ओवी ३३ 

पुढे जाऊन कळकळीने सांगतात,
म्हणोनि हा नरदेह निर्मून l इश्‍वर झाला आनंदसंपन्न l कीं विवेकवैराग्यातें वरुन l नर मद्‌भजन करील ll
- अध्याय ८ ओवी ५२
विनाशीं नर करितां साधन l होईल अविनाशी नारायण l नरदेहासम साधनसंपन्न l दुजा न आन ये सृष्टी ll
- अध्याय ८ ओवी ५३ 

आणि म्हणून प्रत्येक भक्ताला पुढे जाऊन विनंतीही करतात,
म्हणून झालें न जो शरीरपतन l आत्मज्ञाननार्थ करा यत्न l नरजन्माचा एकही क्षण l उपेक्षून  टाकूं नका ll
- अध्याय ८ ओवी ७८ 

हेमाडपंतांनी "नरजन्माचा एकही क्षण" उपेक्षित राहू नये यासाठी काय केलं? हेमाडपंतांनी साईनाथांनाच विनंती केली.
मी तों केवळ पायांचा दास l नका करुं मजला उदास l जोंवरी ह्या देहीं श्‍वास l निजकार्यास साधूनि घ्या ll
- अध्याय ३ ओवी ४० 

पण ही अशी उच्च कोटीची विनंती हेमाडपंत का करु शकले असा प्रश्‍न आपल्या सारख्या सर्वसामान्य भक्तांना पडतो; आणि ह्याचे उत्तरही हेमाडपंतच आपल्याला देतात साईसच्चरिताच्या ४०व्या अध्यायामध्ये.
ध्यानीं मनीं साईचा ध्यास l हा तो निरंतराचा अभ्यास l सात वर्षांचा जरी सहवास l आंस न भास भोजनाचा ll
- अध्याय ४० अवी ११९


हा हेमाडपंतांचा "निरंतराचा"ध्यास आहे; ह्या जन्मातला, ह्याच्या आधिल जन्मातील ही आणि म्हणूनच कायमचाच (forever) प्रत्येक क्षणी हेमाडपंतांना ह्या साईचाच ध्यास होता. साईनाथ जेवावयास यावेत याचीच त्यांना "आस" होती; आणि म्हणूनच त्यांच्या करता "स्वप्न" हा भास नव्हता. म्हणून प्रत्येक साई भक्ताची वाट हेमाडपंतांच्याच वाटेने जाते.


ll हरि ॐ ll

4 comments:

  1. हरि ॐ दादा,
    हो मरण हे जीवनाचे अपरिहार्य सत्य आहे....... त्याशिवाय जीवनाची शृखंला चालणारच नाही.....
    पण तरिसुद्धा सद्‌गुरूंच्या ध्यास हेच सर्वावर उत्तर आहे... हे हेमाडपंत सांगतात या आशयाची ऒवी तुम्ही टाकली त्यामुळे साईचरित्रातील ऒव्यांची परत एकदा आठवण झाली आणि त्यामुळे साईनाथावरील हेमाडपंतांचे प्रेम, ध्यास पाहून मन भरुन आले.....

    sangitaveera vartak

    ReplyDelete
  2. हरि ॐ दादा,

    श्रीसाईसच्चरिताची खरी ओळख झाली ती प.पू बापूंच्या सान्निध्यात आल्यावर. पंचशील परीक्षेचा अभ्यास करता करता अनेक गोष्टींचा उलगडा झाला. हेमाडपंतांसारख्या श्रेष्ठ भक्ताची लेखणी आमच्या जीवनाचा विकास करून आमच्या जीवनातील उजाड रानात नंदनवन फुलू लागले . दादा तुमचा ब्लॉग सुरू झाल्या पासून हा नंदनवन अजून बहरू लागलाय. तुम्ही ब्लॉग द्वारे ओव्यांवर करत असलेले मार्गदर्शन ह्यांनी आता श्रीसाईसच्चरित वाचण्यात , एक वेगळाच आनंद मिळू लागलाय. बऱ्याचश्या गोष्टींवर नीट मनापासून विचार करावासा वाटतो. आणि त्यातून श्रीसाईसच्चरित हे नुसतेच परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी न वाचता मनाला , बुद्धीला विचार करून जीवनाला वळण लावणारा एक अतिशय मोठा खजिनाच आपल्या हाती आपल्या प.पू. बापूंनी दिलाय ह्याची जाणीव होऊ लागली आहे. म्हणूनच दादा तुम्हाला नम्र विनंती की आपण अशा प्रकारचे Discussion Forum सुरु करू शकता कां? ज्याद्वारे प्रत्येक श्रद्धावान भक्ताला ह्या गोड गुरूच्या शाळेतील अमृतकण वेचायला मिळू शकतील.
    -

    ReplyDelete
  3. हरि ॐ दादा,

    Shri Ram,The way you are narrating the sole of life via our favourite Saisatcharitra's Oovi and I agree with the view of Harshadaveera this will be the Platform to all to get more more of "Kay God Guruchi Shala" So Pls keep this Forum lifetime for all.

    Pallaviveera V. Kanade

    ReplyDelete
  4. Hari Om Sameerdada,

    I am not a regular surfer of internet. So there is delay in reading your blog. We all used to read about not wasting any time so that we can achieve our objectives / goals in life. But question used to be what should be that objective for which we should forget our physical needs? I am so happy to get these answers from your blog. It has really given me a new direction when I will now read Shri Sai Satcharitra. It will no more only be for appearing for Panchsheel exams. I will try to use it to make progress in my line which takes me to my PP Bapu.

    Pujya Sameerdada,

    Yeh Dil Mange More!! Pl help us in breaking boxes which are blocking our vision by writing more on this blog about Shri Sai SatCharitra.

    Hari om! Shrikantsinh Deshpande

    ReplyDelete